तासगाव : १४४ वर्षानंतर होणाऱ्या ऐतिहासिक महाकुंभ मेळाव्यास जग भरातुन साधू,संत,भाविक हजेरी लावत आहेत.प्रयागराजला होत असलेल्या या मेळाव्यास तासगाव शहरातुन देखील भक्त गेले असून, या भक्तांन कडून सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध असलेले आणि सध्या भक्ती आणि अध्यात्म क्षेत्रात येण्यासाठी युवकांना प्रवृत्त करणारें वृंदावन निवासी श्री प्रेमानंद महाराज यांना बेदाण्याचा हार अर्पण करण्यात आला आहे.महाराज नित्य वृंदावन प्रदक्षिणा करत असताना या भक्तांनी बेदाण्यांचा हार दिला, यावेळी महाराजांनी विनम्रपने हाराचा स्वीकार करून परिधान केला,आणि सर्वाना आशीर्वाद दिले.या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या ठिकाणी तासगांवचे सुशिल थोरबोले,प्रसाद पैलवान,हर्षद किर्तकर,आदित्य माळी,अथर्व पुरूषोत्तम जोशी,गणेश खंडागळे,सुरेश शिंदे, प्रशांत पैलवान, प्रणव हिंगमिरे,ऋषिकेश काळे,सुरज धनवडे,सुरेश शिंदे उपस्थित होते.