मिरज येथे अवैध गॅस सिलेंडर जप्त ; २ लाख ३५ हजार रु.चा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मिरज येथे अवैध गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून २ लाख ३५ हजार रु.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी प्रशांत अशोक टाकवडे, वय २७ वर्षे, रा नदीवेस, पाटील गल्ली, मिरज, सध्या रा माणिकनगर, जुना हरिपूर रोड, मिरज यास अटक करण्यात आली आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध रित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध रित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता सुचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील यांचे पथकामधील पोह/ अतुल माने व पोना / रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मिरज येथील अमर खड्याजवळील कच्छी हॉल येथून बजाज मॅक्सीमा माल वाहतुक रिक्षामधून अवैध रित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर वाहतुक होणार आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे प्राजक्त कांबळे, महसुल सहाय्यक, पुरवठा शाखा, मिरज यांना सोबत घेवून मिरज येथील कच्छी हॉल येथे जावून सापळा लावून थांबले असता एका बजाज मॅक्सीमा माल वाहतुक रिक्षामध्ये अवैध रित्या घरगुती वापराचे गॅस भरलेले दिसले. बातमीची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पुरवठा निरीक्षक व पथकाने रिक्षा चालकास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत अशोक टाकवडे, वय २७ वर्षे, रा नदीवेस, पाटील गल्ली, मिरज, सध्या रा माणिकनगर, जुना हरिपूर रोड, मिरज असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास रिक्षामध्ये भरलेले गॅस सिलेंडर विक्री परवान्याबाबत विचारले असता त्याने विक्री परवाना नसल्याचे सांगितले. तसेच सदरचे सिलेंडर हे मिरज शहरात विक्री करणेकरीता यश गॅस एजन्सी जयसिंगपूर येथील काढून टाकलेला जुना कामगार रफिक दर्गावाले यांचेकडून आणले असल्याचे सांगितले.
लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक व प्राजक्त कांबळे, महसुल सहाय्यक, पुरवठा शाखा, मिरज यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखरयां चे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली महसुल सहाय्यक, प्राजक्त कांबळे, पुरवठा शाखा, मिरज पोहेकॉ / बसवराज शिरगुप्पी, अतुल माने, अरूण पाटील, अमोल ऐदाळे पोना/ सुशिल मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी पोशि / विनायक सुतार, सुरज थोरात, सुशांत चिले