शक्तिपीठ महामार्गच रद्द करा, जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन: आमदार गाडगीळ यांचा आंदोलनास पाठींबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहीजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कचेरी समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला. यावेळी बोलताना आमदार गाडगीळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ची वेळ घेवुन त्यांच्याशी बैठक लावण्याची जबाबदारी मी घेतो. असे त्यांनी अश्वसित केले. आपल्या जिल्ह्याचे खासदार मा. विशाल दादा पाटील व तासगाव कवठेमहांकाळ चे आमदार रोहीतदादा पाटील यांनीही फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनास पाठींबा देवुन सरकारने जर भुमीका बदलली नाही तर आम्हीही तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी होउ असे जाहीर केले.
अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. पुर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करणार असल्याचे प्रसार माध्यमातून प्रसारित झाले आहे. आंदोलन करुनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलुन महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या. ज्या भागातुन हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तिपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला.
बारा जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेवुन शक्तिपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी विरोध करुन महामार्ग रद्द चे नोटीफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधीना याबाबत निवेदने देवुन चर्चा केली आहे. आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भुषण गुरव, उमेश एडके,प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील,घनश्याम नलवडे, रमेश एडके उत्तम पाटील , गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील इत्यादीसह शेकडो शेतकरी, महिला व पुरुष उपस्थित होते.