प्रतिष्ठा न्यूज

हिंदू एकताचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीचे औचित्य साधून टिंबर एरिया सांगली येथे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या शुभहस्ते माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले की, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यानंतर भगवा झेंडा, देश आणि धर्म यासाठी जी तळमळ पाहिजे ती फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यात दिसून येते, हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यांची शिवसेना आज महाराष्ट्राला व देशाला अशाच प्रखर देशाभिमान असणाऱ्या नेत्याची गरज निर्माण झाली आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

यावेळी प्रसाद रिसवडे, अनिल शेटे, मनोज साळुंखे, नितीन कोरे, गजानन मोरे, संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, रवींद्र वादवणे, अरुण वाघमोडे, प्रदीप निकम, शांताराम शिंदे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
Don`t copy text!