प्रतिष्ठा न्यूज

आमरण उपोषण स्थगित,आठ दिवसात गुन्हा दाखल होणार?अन्यथा,मनसे स्टाईलनें आंदोलन करणार अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहार प्रकरणी तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यानें या प्रकरणी मनसेचे नेते अमोल काळे यांनी गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.परंतु आज विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी आठ दिवसात न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतले.तासगाव बाजार समितीच्या विस्तारित बेदाणा मार्केटच्या बांधकामात अपहर झाला होता.या प्रकरणी चौकशी करुन दोषी असणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्या बाबतचा प्रस्ताव लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी तासगाव पोलीस ठाण्याला दिला होता.मात्र, चार महिन्यांपासून तासगाव पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेचे अमोल काळे यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते.गुरुवारी पोलिसांनी काळे यांचे उपोषण सोडवण्या साठी समजूत घालण्याचे प्रयत्न केले होते पण त्यात त्यांना यश आले नाही.आज तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी उपोषण स्थळी अमोल काळे यांची भेट घेतली.चार महिन्यांपासून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याबाबत काळे यांनी यावेळी संताप व्यक्त केला.यावेळी, पोलिसांनी लेखापरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्यास केलेला प्रस्ताव निकाली काढल्याचे पत्र दिल्याचे सांगितले.त्यामुळे आठ दिवसात न्यायालयीन प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचें आश्वासन लेखापरीक्षक पैलवान यांनी काळे यांना दिले.त्यानंतर काळे यांनी उपोषण मागे घेतले.त्यानंतर बोलताना काळे यांनी आठ दिवसात गुन्हा न दाखल झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे सांगितले.तसेच आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर,पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा अमोल काळे यांनी यावेळी दिला.
Show More

Related Articles

Back to top button
Don`t copy text!