सांगली जिल्हा सब ज्युनिअर मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन व पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा सब जुनिअर मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण ८४६ खेळाडू सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमधून २३ व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. जिल्हा स्पर्धा भिकवडी खुर्द विटा या ठिकाणी संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन गणपत सावंत लोकनियुक्त सरपंच भिकवडी खुर्द व प्रा.सिद्राम चव्हाण यांच्या हस्ते तर प्रा. शिला मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी पाटणकर गुरुकुल अकॅडमीचे अमित पाटणकर क्रीडा मार्गदर्शक पाटणकर गुरुकुल अकॅडमी तसेच सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब समलेवाले व युवराज खटके, हिम्मत शिंदे, विजयकुमार शिंदे, सचिन चव्हाण, प्रा.डॉ.संजय पाटील, कृष्णा पाटील, समीर सनदी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले भिकवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये या स्पर्धेचे नियोजन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जिल्हा संघटनेचे आभार व्यक्त केले व या स्पर्धेमधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे त्याला शुभेच्छा दिल्या व खेळाचे महत्व देखील त्यांनी सांगितले संघटनेला जी काही मदत लागेल ती करण्याची त्यांनी ग्वाही दिली त्याचबरोबर प्रा.सिद्राम चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिला मोहिते यांनी सर्व खेळाडूंना मैदानावर आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व मोबाईल पासून दूर राहून आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली ठेवावी व स्पर्धेमध्ये हार जीत न बघता जोमाने सहभाग घ्यावा व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पहिल्या तीन क्रमांकांना पाटणकर गुरुकुल अकॅडमी यांच्यावतीने मेडल व जिल्हा संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र, पाणी बॉटल व सॅक देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गणेश सिंहासने यांनी केले तर प्रास्ताविक अमित पाटणकर यांनी केले आभार प्रा.बाळासाहेब माने यांनी मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, राजेंद्र कुडलापगोळ, अभिजीत तासगावकर, अंकुश कलगुडगी, विठ्ठल जाधव, अश्विनी दुकानदार, तात्यासाहेब कांबळे, प्रा.माणिक गोरवे, बाबासो पवार, सदन सूर्यवंशी, हसन मुलानी, प्रमोद ऐवळे, विकास ताटे, विकास सूर्यवंशी, शुभम यादव, सौरभ खोबरे, एम.बी. एस.के.महाविद्यालयातील स्वयंसेवक तसेच पाटणकर गुरुकुल अकॅडमी मधील स्वयंसेवक.