प्रतिष्ठा न्यूज

दिघंची येथील महालक्ष्मी महिला पतसंस्थेत मोठा अपहार; अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढण्याचा महेश खराडे यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
आटपाडी / प्रतिनिधी : दिघंची येथील महालक्ष्मी महिला पतसंस्थेत मोठा अपहार झाला असून साडे चार कोटींच्या ठेवी बुडविल्या आहेत. त्या ठेवी तात्काळ द्याव्यात अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेटे यांच्या घरा वर मोर्चा काढू, सहायक निंबधक कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी निवेदनद्वारे दिला आहे.
तहसीलदार सागर ढवळे व सहकार अधिकारी सागर शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे दिघंची येथे गेल्या 35 ते 40 वर्षा पासून महालक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत या संस्थेत सुमारे साडे तीनशे ठेवीदारांनी साडे चार कोटी ठेवल्या होत्या. त्यांची मॅचूरिटी झाल्या नंतरही ठेवीदारांना ठेवीची मुद्दल ही मिळालेली नाही. पैसे मिळालेले नसलेने अनेक ठेवीदार अडचणीत आले आहेत अनेकांना उपचारासाठी पैसे नसल्याने तडफडून जीव सोडावा लागला आहे तीन ठेवीदार यामुळे दगावले आहेत. त्यामुळे तात्काळ ठेवी द्याव्यात अन्यथा संस्था अध्यक्षाच्या घरावर मोर्चा काढू, सहकार विभागाचे दुर्लक्ष्य सुरु आहे त्यामुळे या विभागाच्या आटपाडी कार्यालयाला टाळे ठोकू.
संबंधित संस्थेचे शासकीय लेखा परीक्षण विभागा कडून ऑडिट करावे, वसुलीसाठी नियमित वसुली अधिकारी नियुक्त करावेत, कर्ज दारा च्या वर 101 च्या कारवाई करून तात्काळ वसुली करावी यावेळी तालुका अध्यक्ष विजय माने अमित दबडे निवृत्ती औधकर अजित हळीगले मधुकर मोरे पांडुरंग शेरकर दशरथ मोरे शिवाजी सावंत अर्जुन यादव योगेश गोंजारी मारुती भोसले आदिसह अन्य उपस्थित होते.