प्रतिष्ठा न्यूज

संभाजी ब्रिगेड पक्षाच्या पुनर्गठन बैठकीत निवडणुका लढवण्यावर शिक्कामोर्तब : बैठक मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकतीने लढवण्यावर संभाजी ब्रिगेडचा आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला. जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी स्वागत केले. सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून.अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मा बच्चू कडू करत असलेल्या आंदोलनाला सांगली जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्याचा निर्णय झाला.
जुने नवीन पदाधिकारी नव्याने काम करायला अनेकांनी इच्छा व्यक्त केल्या.जिल्हाध्यक्ष पदासाठी युवराज शिंदे, महानगर अध्यक्ष पदासाठी जालिंदर फारणे,तौफिक शेख, संदीप शिंदे, सद्दाम मोमीन, महेश भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी शिवाजी जाधव, नितीन पवार, महिला आघाडी महानगराध्यक्ष पदासाठी सुलोचना पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी अरुणा कोळी, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी रशीद शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदासाठी मुन्ना मुजावर इत्यादी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी निरक्षक संपर्कप्रमुख दिनेश जगदाळे म्हणाले या निवडी राज्यकारणी विचार निमाय करून येत्या दहा दिवसात निवड पत्र देण्यात येतील. त्यानंतर त्या त्या विभागातील अध्यक्षांनी आपापल्या कार्यकारण्या कराव्यात. पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे म्हणाले येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड शिवाय पर्याय नाही. कारण हे सर्वच पक्ष सत्तेवर बसून मलिदा खाण्यासाठी धरपड करत आहेत. समाजात जाती जातीत तेड निर्माण करून वातावरण दूषित करत आहेत. जनता यांना कंटाळली आहे.त्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचार घेऊन संभाजी ब्रिगेड यापुढे सर्वसामान्यांसाठी एकच पर्याय आहे. जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले येणाऱ्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत प्रसंगी समविचारी पक्षांबरोबर युती करूं, सांगलीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निवडणुका लढवण्याचे निश्चित केले आहे. यावेळी राज्य संघटक सुयोग औंधकर, महेश भंडारे, प्रकाश पाटील, जालिंदर फारणे,संदीप शिंदे, रामहरी ठोंबरे, शिवाजी जाधव, सद्दाम मोमीन,सुबहन सय्यद, वेदांत स्वामी, सुलोचना पवार, नितीन पवार, मुन्ना जमादार, तोफिक शेख, राजेंद्र पवार, मल्हार सलामी, रशीद शेख,अजय सातारमेकर, सुहास मुल्ला, प्रशांत सूर्यवंशी, गणेश पाटील, विशाल कोळी, अरुणा कोळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.