नशा मुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पथकाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बक्षीस देऊन केला सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील सपोनि संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणारे टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे. त्यासाठी पालकमंत्री महोदय यांनी नशा मुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे.
माननीय पालकमंत्री महोदय यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशा मुक्त अभियानांतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते. सदर जाहीर केले प्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशा मुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. यावेळी मा. पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा, म. गांधी चौक पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान केला.
*विशेष म्हणजे मा. पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देवून कुटूंबायांचा देखील एकप्रकारे सत्कार केला आहे.*
सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी मीटिंग दरम्यान घेण्यात आला. सदर कार्यक्रमास माननीय पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी माननीय पालकमंत्री यांनी मा. पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे व पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.