शिक्षक परिषद महाराष्ट्रातील एकाही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही – शशिकांत पाटील- अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षक निलंबन प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक मान. आमदार संजयजी केळकर यांची शिक्षण संचालक यांचे सोबत यशस्वी चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग पुणे विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक आमदार संजय केळकर यांना निलंबनाची कारवाई स्थगित करण्याचे शिक्षण संचालक मा. शरद गोसावी यांनी आश्वासन दिल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा या विषयावर सुरू आहे.
*जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत २० शाळेतील ३५ शिक्षकांवर शाळेची पटसंख्या कमी आहे या कारणास्तव निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी नुकतेच दिले आहेत त्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने गेली दोन दिवस पाठपुरावा केला जात आहे त्याकरिता आज संघटनेचे संस्थापक मान.आमदार श्री. संजययी केळकर साहेब यांनी श्री.शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक यांचेसोबत सविस्तर चर्चा करून झालेली कारवाई अत्यंत चुकीची असून सदर कारवाईला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत स्थगितीचे आश्वासन संचालक महोदयांनी दिले*
*सदर कारवाई नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली असून यामध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. परंतु या संदर्भात राज्यशासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत सदर शाळा ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील आहेत. ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाही शेती व्यवसायाची बिकट अवस्था झाली आहे. अशा अडचणींमुळे वाड्या वस्त्यावरील अनेक कुटुंब शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांवरील शाळांची पट संख्या कमी झाली आहे. केवळ एका आढावा बैठकीच्या आधारावर शिक्षकांवर कारवाई करणे चुकीचे आहे. ऐन शाळा सुरु होण्याच्या काळात अशा स्वरुपाची निलंबनाची कारवाई करून जिल्ह्यातील शिक्षकांमधे भितीची व असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी एखाद्या कृती कार्यक्रमाची आखणी करून त्यामधे कुचराई होत असल्यास अशा शिक्षकांना समज देणे किंवा सक्तीने बदली करणे या कार्यवाहीचे समर्थन होऊ शकते परंतु तातडीने निलंबनाची कारवाई करणे अन्यायकारक असून नियमबाह्य सुध्दा आहे.*
याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय पगार , राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, पुणे विभागीय अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांचेसह राज्य व जिल्हा कार्यकारणीचे वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.