उद्योजक प्रकाश पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप !

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : मंगळवारी जिल्हा परिषद शाळा, खुजगाव ता .तासगांव येथे कै. बनूबाई संपतराव पाटील यांचे स्मरणार्थ खुजगाव मधील उद्योजक प्रकाश संपतराव पाटील यांचे वतीने जिल्हा परिषद शाळा, खुजगाव मधील मातृ-पितृछत्र हरवलेले विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना मोफत स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य तसेच इयत्ता पहिली ते सातवी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील पालक शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते, यावेळी ग्रामस्थांनी प्रकाश पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे अभिनंदन करून आभार मानले .