राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता ग्रंथाचे शनिवारी शहाजी महाविद्यालयात प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी 10:30 वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार आहे. या ग्रंथाचे प्रकाशन श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चीप पेट्रन खासदार शाहू छत्रपती महाराज यांचे शुभहस्ते व संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पी. पाटील, केडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते अॅड. डॉ. रमेश विवेकी यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. सर्वांनी या ग्रंथ प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले आहे .
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त शहाजी महाविद्यालयात 15 हून अधिक उपक्रम पार पडले. यामध्ये शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुता यावर विचारवंतांनी प्रकाश झोत टाकला. त्यांच्या या व्याख्यानातील विचार पुस्तक रूपाने श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने संपादित केलेले आहेत.
कोल्हापूरच्या निर्मिती प्रकाशनच्या वतीने सदर पुस्तक प्रकाशित केले असून प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, अनिल म्हमाने, आर. जे. भोसले, एम. व्ही. भोसले, डॉ. पी. बी. पाटील सदर प्रकाशन समारंभाचे निमंत्रक आहेत.