निवेदन देऊन,वारंवार सांगूनही तासगाव पालिका दखल घेत नाही,नागरिकांनी प्रत्येक वेळी मोर्चाच काढायचा काय?

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील सिध्देश्वर रोड लुगडे हॉस्पिटल जवळ असणाऱ्या दोन अशोकाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नगरपरिषदेने त्यांच्या फांद्या छाटाव्यात,अशी मागणी या परिसरातील नागरिकांच्यातून गेल्या एक वर्षा पासून होत आहे.तब्बल दहा महिन्यापूर्वी परिषदेस याबाबतचे निवेदन देवुन अद्याप दखल न घेतल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.याबाबत आज दलित महासंघ मोहिते गट यांनी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.नगरपरिषदेस लुगडे हॉस्पिटल पररिसरातील नागरिकांनी झाडांबाबत मागील वर्षी निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुंदन लुगडे मेडिकलसमोर अशोकाची झाडे आहेत.ती झाडे बरेच दिवस झाले सवळले नाहीत त्यामुळे ती अवास्तव वाढलेली आहेत.व त्यांच्या फ़ांद्या ही खाली आलेल्या आहेत.उंच वाहनास टेकत आहेत. तसेच झाडाची उंची ही फार वाढली आहे.वादळी वाऱ्यात उंचीमुळे धोका संभवतो लवकरात लवकर याची दखल घेऊन ही अशोकांची झाडे सवळून घ्यावीत व त्यांची उंचीही कमी करावी,ती तोडू नयेत,अशी विनंती ही निवेदनात केली आहे.आता नुकत्याच झालेल्या वादळी पावसात सुसाट वाऱ्याने या झाडाची एक फांदी मोडून पडली,दहा महिन्यापूर्वी निवेदन देऊन वारंवार अधिकाऱ्यांना भेटून ही नगरपरिषदेकडून त्याची दखल घेतली नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.
याबाबत चौकशी केली असता पालिकेकडे पैसे नाहीत असे उत्तर येत आहे.निवेदन देऊन वारंवार सांगूनही पालिका दखल घेत नाही.
पालिका प्रशासन एखादा नागरिक जखमी होण्याची वाट पहात आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.