प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज /अक्षय कोठावळे 
सांगली : कामगार व कुटुंबियांचे कल्याणकारी योजना व उपक्रमांद्वारे हीत साधणारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ७३ व्या वर्षात पदार्पन करीत आहे. त्यानिमित्ताने मंडळाचा वर्धापन दिन १ जुलै २०२५ रोजी ललित कला भवन,सांगली येथे साजरा करण्यात आला.  यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास विविध आस्थापनेचे वरिष्ठ अधिकारी, एच आर प्रतिनिधी प्रिंट मीडिया चे अधिकारी कामगार भुषण व गुणवंत कामगार युनियन प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी बहुसंख्य कामगार वर्ग व महिला वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व नारायण मेघाजी लोखंडे व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व प्रतिमेस पुष्पहार घालुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे टाइम ऑफिस प्रमुख  श्रीकांत पाटील, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना चे लेबर ऑफिसर  दिपक नुलके व संपत पाटील टाइम ऑफिस, यशवंतराव मोहिते कृष्णा सह.साखर कारखान्याचे अकाउंट ऑफिसर मोहन कदम गरवारे कंपनी वाई येथील युनियन चे प्रमुख  दादासाहेब काळे तसेच कोपलँड कंपनी अतीत कराड चे युनियन अध्यक्ष  महादेव पाटील यांच्या हस्ते झाले.
 कार्यक्रम प्रसंगी  प्रमोद शिंदे उपाध्यक्ष युनियन कोपलँड कंपनी कराड,  अशोक लाड  टाईम ऑफिस क्रांती साखर कारखाना कुंडल व अधिक लाड भजन संघप्रमुख क्रांती साखर कारखाना  एस. जी.  ढोले कार्यकारी संचालक राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,  दीपक कानडे एच. आर.  अधिकारी राजारामबापू पाटील दूध संघ,  डी एम पाटील सेक्रेटरी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,  महेश पाटील लेबर ऑफिसर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,  विकास पाटील व सहकारी राजारामबापू पाटील सहकारी बँक,  पेठ,  विवेक रावते गुणवंत कामगार 2025 महावितरण सांगली  गिरीश चितळे सर गुणवंत कामगार  महेश धांडे यश पेट्रोलियमचे मॅनेजर तासगाव.,
 दैनिक सकाळ माध्यम समूहाचे सांगली जिल्हाचे मार्केटिंग मॅनेजर  घनश्याम जाधव साहेब, रमेश पुजारी अधिकारी गरवारे इंडस्ट्रीज,  दत्तात्रय माळी युनियन अध्यक्ष,सांगली जिल्हा एसटी महामंडळ,  अशोक मोरे डीसीसी सांगली जिल्हा एसटी महामंडळ, संतोष लंकानरे डीसीसी सांगली एसटी जिल्हा महामंडळ,  अनुभव पवार सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, श्रीमती निर्मला गुरव व  महेश मनोहर शेटे यश पेट्रोलियम सांगली, श्री पांडुरंग निकम ई डी पी मॅनेजर, डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना सांगली  चे  चंद्रकांत पवार हेड टाइम ऑफिसर,  अभिजीत पाटील  प्रकाश चव्हाण कामगार वर्ग डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना,  यांच्यासह विविध आस्थापनांतील अधिकारी वर्ग एच आर वर्ग अधिकारी कामगार वर्ग व महिला प्रतिनिधी वर्ग तसेच मंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*या कार्यक्रमाच्या निमित्त मंडळाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त  विशाल पाटील साहेब खासदार सांगली  सुरेश खाडे साहेब आमदार मिरज तथा मा. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य   जयंत पाटील साहेब आमदार सांगली मा.  सुधीर काका गाडगीळ साहेब आमदार सांगली यांनी . सुमित कदम जनसुराज्य पक्ष श्री प्रतीक पाटील चेअरमन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना या मान्यवरांनी पत्राद्वारे मंडळाच्या या कामगार कार्यास शुभेच्छा दिल्या*
 *उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सांगली गटाचे कामगार कल्याण अधिकारी श्री अरुण लाड यांनी केले. यावेळी  सुखवास कांबळे प्रस्तुत स्वरधारा म्युझीकल ऑर्कस्ट्रा प्रस्तुत आर डी एक्स सारेगमा तर्फे  राम चौगुले सौ विना चौगुले व टिम यांचा भावगीत व भक्तीगीतांची सुरेल स्वरसंध्या यांच्या गीतसुगंध व सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्यास विशेष शोभा आणली.* यावेळी मराठी, हिंदी जुने व नवीन गाण्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. गट सांगली अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात सन २०२४-२५ मध्ये मंडळाच्या विविध आर्थिक लाभाच्या योजना व कल्याणकारी योजना अंतर्गत भरीव निधी मिळवणाऱया 200 ते 250 आस्थापनापैकी अग्रगण्य असणाऱ्या 50 आस्थापनांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचे गट सांगली तर्फे विशेष अभिनंदन पत्र व बुके  व एक वृक्षारोपण साठी वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत .अरुण लाड कामगार कल्याण अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार .पियुष पाटील व .महेश रसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता केंद्र संचालक .विकास पाटील,.रुपेश मोरे, संघसेन जगतकर, तर कनिष्ठ लिपिक .अक्षय पोतदार, केंद्र सेवक .गणेश कुंभार, अभिजीत  भोई .अरविंद केसकर  प्रत्येक केंद्रातील महिला कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. अशा रीतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.

Related Articles