प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यातील वीजपुरवठा सुरळीत करा – राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष मा. प्रकाश धोडीकर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

1. वीजपुरवठा सुरळीत करणे:
गगनबावडा, असळज , खोकुर्ले  आदी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांचे अभ्यासात खंड पडत असून, ऑनलाईन शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे.
2. शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा:
शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्री अपरात्री शेतीपंप चालवावे लागत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
3. गगनबावडा वन विभागात झाडांची कापणी:
गगनबावडा- धुंदवडे  मार्गावर अनेक झाडांची फांद्या रस्त्यावर आडवी झाल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यावर वन विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्ता मोकळा करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
प्रकाश पाटील यांनी सांगितले की, “ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने वीज व रस्त्यांच्या समस्यांवर लक्ष द्यावे. अन्यथा जनआंदोलनाचा इशारा देण्यात येईल.”

राष्ट्रवादी काँग्रेस गगनबावडा अध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुचित्रा पडवळ, व सायरा जमादार, उपाध्यक्ष भीवाजी वरेकर      गणेश वापिलकर,,दिलीप पाटील व अन्य नागरिक मोठ्या संखेंने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!