केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात साजरा–यशाची नवी शिखरे गाठण्याचा निर्धार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा सोळावा वर्धापन दिन एक जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी शाळेच्या प्रगतीचा गौरव करण्यात आला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर आनंदमय झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजन ,कै. गुलाबराव पाटील साहेब तसेच कै. संयोगिता पाटील मॅडम यांच्या फोटो पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातील नामवंत मान्यवर सौ.अर्चना मुळे मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टीना मार्टिन यांनी स्वागत भाषणातून शाळेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य, गीते, नाटिका आणि समूहगायन सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पालकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे मनोगतही कार्यक्रमात ऐकायला मिळाले. शाळेचे संस्थापक मा. पृथ्वीराज पाटील सर, विश्वस्त वीरेंद्र पाटील सर आणि शाळेचे समन्वयक सतीश पाटील सर यांनी शाळेच्या भविष्यातील उद्दिष्टांविषयी मार्गदर्शन केले.
या मंगल दिनाच्या प्रसंगी शाळेतील मुलांना बालाजी मंदिर, जैन मंदिर,चर्च, मूकबधिर शाळा आणि दर्गा परिसर या ठिकाणी भेट देऊन आणली मुलांनी खूप मोठ्या आनंदाने व उत्साहाने हा दिवस साजरा केला आणि शेवटी केक कापून वर्धापन दिनाचा आनंद घेतला तसेच सर्वांनी केकचा आस्वाद घेतला. शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी सर उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम आणि समन्वयक अश्विनी येळकर मॅडम यांनी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.