प्रतिष्ठा न्यूज

जीपीएमटीच्या प्रमिलादेवी पाटील फिजिओथेरपी काॅलेजने भारती विद्यापीठाच्या पोष्टर स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि.३ : येथील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या प्रमिलादेवी पाटील फिजिओथेरपी काॅलेजच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीने आंतरराष्ट्रीय स्कोलियोसिस जागरुकता दिनानिमित्त २८ जून रोजी आयोजित केलेल्या पोष्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत फिजिओथेरपीच्या चार काॅलेजनी सहभाग नोंदविला होता.
विजेत्या विद्यार्थिनी असीला राजपूरकर, रिद्धी मगदूम आणि उंमेमेहेक खडीवाले यांचे संस्थेतर्फे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय यशस्वी उपचार पध्दतीने रुग्णास वेदनामुक्ती देणाऱ्या फिजिओथेरपी उपचाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. असा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम पुरा करीत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पोष्टर स्पर्धेत सिध्द झाली अशी प्रतिक्रिया स्पर्धा आयोजक भारतीचे फिजिओथेरपी काॅलेज व पृथ्वीराज पाटील पाटील यांनी व्यक्त केले. स्पर्धकांना संस्था चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, समन्वयक प्राचार्य सतीश पाटील व प्राचार्य डॉ. आकांक्षा जोशी आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या यशाबद्दल संस्था, काॅलेज आणि विद्यार्थ्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.