प्रतिष्ठा न्यूज

तासगावात एकदिवसीय महिला संपत्ती अधिकार परिषद संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी महिला साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव याठिकाणी “प्रकाशवाटा – एकदिवसीय महिला संपत्ती अधिकार परिषद” संपन्न झाली.या परिषदेचे आयोजन संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,महिला तक्रार निवारण कक्ष व प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी मार्गदर्शिका ॲड. ऋतुजा गुरव यांनी *महिलांविषयक कायदे व अधिकार* या विषयावर मार्गदर्शन करून महिलांना असलेले अधिकार कायदे यांचे सविस्तर माहिती देऊन त्याचा वापर कसा करावा हे सांगितले.तसेच महेश सावंत (संरक्षण अधिकारी- तासगाव) यांनी लैंगिक हिंसाचार कायदा,कौटुंबिक हिंसाचार कायदा,बाल संगोपन योजना, आदिशक्ती समिती याबद्दल माहिती दिली.विजय लोखंडे (महिला समुपदेशन केंद्र-तासगाव) यांनी समुपदेशन केंद्रामध्ये होणाऱ्या प्रक्रिया याबद्दल माहिती दिली. निमणी गावच्या सरपंच रेखा पाटील यांनी “घराचं कुलूपच  महिला आहे” हे आपल्या वक्तव्यातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक यांनी केले.या परिषदेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील,डॉ.एल.व्हि. भंडारे.डॉ.ए.एस.चिखलीकर डॉ.डी.टी.खजुरकर.प्रा.ए.आर
पंडित.प्रा.प्रमोद शेंडगे,उपस्थित होते. कार्यालयीन कर्मचारी संजय कुंभार, हनुमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी व सामाजिक संस्थांतील कार्य करणाऱ्या महिला तसेच आसपासच्या गावातील महिला  उपस्थित होत्या. या परिषदेचा लाभ परिसरातील महिला व महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींनी घेतला.जयीदा बकाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.