जनतेच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सतर्क – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा आदेश

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथे नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व शासकीय विभागांना स्पष्ट सूचना दिल्या की, “सर्वसामान्य जनतेला योजनांचा लाभ देताना त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या.”
यावेळी तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी वीज, आरोग्य, महावितरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांना तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील धोकादायक ठिकाणांबाबत भूमापन व अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. दरडग्रस्त व पावसाने बाधित भागांत सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर सहकार्य करत प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.