प्रतिष्ठा न्यूज

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात सीएसआर फंडातून ‘बंक बेड’ चे जिल्हाधिकारी यांच्या वितरण

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी बँक ऑफ इंडिया यांच्या सीएसआर (CSR) फंडाच्या माध्यमातून ६० बंक बेडचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर पुनीत द्विवेदी, एलडीएम मंगेश पोवार, तसेच विविध शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात बोलताना द्विवेदी यांनी बँक ऑफ इंडियाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला. “गरजू विद्यार्थिनींसाठी बंक बेड पुरवणे ही खूपच आवश्यक आणि सकारात्मक गोष्ट असून, जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले,” असे ते म्हणाले. तसेच, येत्या काळात कस्तुरबा विद्यालयासाठी इतर गरजेच्या वस्तूही सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करत, “वसतिगृहातील मुलींना या सुविधांचा लाभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरेल,” असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी केवळ उपलब्ध सुविधांचा लाभच न घेता अभ्यासातही मेहनत घालून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती वसुंधरा कदम-पाटील मॅडम यांनी केले. बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर प्रदीप पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षक दिगंबर गिरीबुवा यांनी केले.

या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक, तहसीलदार गोरे, गटविकास अधिकारी श्रीमती अल्मास सय्यद, प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम-पाटील, जिल्हा समन्वयिका आम्रपाली देवेकर, केंद्रप्रमुख सुहास पाटील, गृहप्रमुखा गीता पाटील, मुख्याध्यापक रंगराव गोसावी, तसेच बँक ऑफ इंडिया गगनबावडा शाखेचे शाखाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच मानसी कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुस्ताक वडगावे, सदस्य, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!