प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शोभाताई धुमाळ सेवापूर्ती सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शोभाताई पांडुरंग धुमाळ या 36 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करून आणि प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक श्री.अभय अनंत पोतदार हे 38 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करून आज नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा येथील माळी चित्रमंदिरच्या सभागृहात संयुक्त असा सेवापूर्ती समारंभ पार पडला. शिक्षणाधिकारी श्री. मोहन गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सौ. शोभाताई धुमाळ आणि त्यांचे पती पांडुरंग धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी शिक्षण सहसंचालक श्री. नामदेवराव माळी यांच्या हस्ते श्री. अभय पोतदार यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी श्री. गणेश भांबुरे,सौ. गीता शेंडगे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विमल माने,सौ. माधुरी गुरव, प्रकाश कांबळे, प्रशासनाधिकारी श्री. रामचंद्र टोणे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी विश्वास साबळे, स्वप्नाली माने, निवृत्त केंद्रप्रमुख शशिकांत माने यांच्यासह
विविध शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, जिल्हा परिषदेतील लिपिक असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कुंडीतील रोपांना जलसिंचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विमल माने यांनी स्वागत प्रास्ताविक केले. त्यानंतर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी श्री. रामचंद्र टोणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच एस. सी. ई. आर. टी. चे माजी सहसंचालक नामदेवराव माळी यांचे उपशिक्षणाधिकारी श्री. गणेश भांबुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्ती निमित्त सौ. धुमाळ आणि श्री. पोतदार यांचा सत्कार झाला. यावेळी शिक्षिका सौ. प्रिया पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. भांबुरे, सौ.माधुरी गुरव, सौ. गीता शेंडगे, एस. आर. पाटील, तुषार पोतदार, पांडुरंग धुमाळ स्नेहल धुमाळ, सुभाष मरीगुद्धी, सहाय्यक प्रशासनाधिकारी संतोष वीर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शोभाताई धुमाळ आणि श्री. अभय पोतदार यांच्या कार्याचा गौरव केला.
शिक्षणाधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, शोभाताई धुमाळ या अत्यंत शांत, संयमी आणि पडेल ते काम चोख पार पाडणाऱ्या आहेत. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी कुणाशीही भांडण तंटा किंवा वादविवाद केलेला नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाशी त्यांचा सौहार्दपूर्ण वर्तणूक होत असल्याने प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आपुलकी, प्रेम वाटायचे. आपल्याकडे येणाऱ्या लोकांशी माणुसकीच्या भावनेने कसे तादात्म्य पावायचे. त्यांच्याशी ऋणानुबंध कसे ठेवायचे हे शोभाताईंना चांगले ज्ञात आहे. आपण चांगले पेरले तर त्यातून चांगलेच उगवते हे लक्षात घेतले पाहिजे. समाजात कसे टाळू आणि कष्टाळू अशी दोन प्रकारची माणसे बघायला मिळतात. त्यापैकी शोभाताई या कष्टाळू लोकांमधील आहेत. त्यांनी आपला प्रपंच चांगल्या प्रकारे सांभाळून मुलांना उच्चशिक्षित केलेले आहे. कठीण प्रसंगात आपल्या पतीची साथ चांगल्या प्रकारे निभावली आहे. अभय पोतदार सुद्धा घेतलेले प्रत्येक काम तडीस नेणारे आहेत. या दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
माजी शिक्षण सहसंचालक श्री. माळी म्हणाले, मिरज तालुका गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असताना सन 2015 मध्ये अनेकदा बाहेरगावी जावे लागले त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी धुमाळ मॅडम यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून सोपवलेली कामगिरी अनेकदा चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. एक विश्वासू सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.
शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी आभार मानले. प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री. रियाज शेख, कक्ष अधिकारी श्री.धनंजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक सदानंद कदम, केंद्रप्रमुख घोडके, धोंडीराम खोत, सौ.रजनी शहा, रामचंद्र जाधव,माजी अधीक्षक कुबेर चौगुले,सहाय्यक प्रशासनाधिकारी श्री. सुनील माळी, खासदार विशाल पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय कुलकर्णी यांनीउपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.