लक्ष्मी मंदिर ते सूतगिरण रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रोड वरून जाणाऱ्या लोकांचा वनवास कधी संपणार? सांगली शहरात अनेक ठिकाणी चांगले रस्ते उकरून नवीन रस्ते केले जात आहेत. मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. तरी हा रस्ता केला जात नाही. प्रमाणापेक्षा जास्त स्पीड बेकर आहेत. या रस्त्यावरून एमआयडीसी, ताणंग, कवठेमंकाळ हायवे ला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मोठी वाहने अनेक असतात. पण या रस्त्याच्या अवस्थेची कोणीही दखल घेत नाही. खड्डे जीव घेणे आहेत.
लक्ष्मी मंदिर चौक अतिशय लहान आहे. घाई गडबडीत सिग्नल उभा केला.अनेक वेळा माती मिक्स मुरूम या खड्ड्यामध्ये टाकला जातो. तो एका पावसात वाहून जातो. या मलमपट्टीच्या कामांमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी होते.
या भागातील अनेक मान्यवर महापालिकेची उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आपल्या गल्लीतील कार्यक्रमांसाठी आपल्या नेत्यांना वारंवार घेऊन येत आहेत. अशांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे. शाळेला जाणारी मुलं, रिक्षा ,जेष्ठ मंडळी यांना मोठी कसरत करावी लागत आहे.अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन करावे लागेल. असा इशारासंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला.