माझा दिवस सैनिकांसाठी,वाढदिवस देशासाठी,आमदार रोहित पाटील यांच्याकडून तालुक्यात सैनिक सन्मान अभियान

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताला सामरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे हेतूने आमदार रोहित पाटील यांनी वाढदिवसाच्या कोणताही वैयक्तिक कार्यक्रम न करता सेना कल्याण निधीसाठी संपूर्ण तालुक्यात सैनिक सन्मान अभियान अंतर्गत निधी संकलनाचा उपक्रम 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान राबविण्याचा निर्धार केला आहे.त्याच अनुषंगाने आज तासगाव शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.यावेळी स्वतः आमदार रोहित पाटील यांनी निधी संकलन उपक्रमात सहभाग घेतला.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले देशहितासाठी केलेल्या माझ्या आवाहनाला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील जनतेकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही माझ्यासाठी आनंदाची आणि प्रेरणादायक बाब आहे.