प्रतिष्ठा न्यूज

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री बच्चू (भाऊ) कडू यांचा 5 जुलै रोजी साजरा करण्यात येणारा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : दि. 4 :  प्रहार जनशक्ती पक्षाचे   नेते श्री बच्चू (भाऊ) कडू यांचा 5 जुलै रोजी वाढदिवस असून त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यभरात शेतकरी आत्महत्या,शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी,विधवा, दिव्यांग, व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाची गांभीर्यपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे,तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच हार, तुरे, बॅनर, फलक,पोस्टर, लावू नयेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
तसेच शेतकऱ्यांचा “सात बारा कोरा कोरा कोरा” ही पदयात्रा 7 जुलै रोजी पापळ जि. अमरावती ते चिलगव्हाण जि. यवतमाळ असणार आहे ही पदयात्रा शेतकरी, कष्टकरी,विधवा, बेरोजगार, दिव्यांग,व इतर वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे तरी वाढदिवसाला फाटा देऊन सर्व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सामील व्हावे असे आवाहन श्री बच्चू कडू यांनी केले आहे.
याबाबतचे लेखी पत्र, सावळज येथील प्रहार जनशक्ती कार्यालाय सावळजचे अध्यक्ष राहुल कलाल यांना प्राप्त झाले आहे. यावेळी प्रहारचे राहुल कलाल,राजू निकम, राजेंद्र कलाल,बाबुराव पाटील, विश्वास निकम, संदीप केडगे आदी मान्यवर उपस्थित होते.