प्रतिष्ठा न्यूज

कॉंग्रेसमधील विश्वासघातामुळे भाजपवाशी झालेल्या पृथ्वीराज पाटील यांना लोकसभेला संधीची शक्यता – राजकीय जाणकारांचे मत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शहर जिल्हा कॉंग्रेचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये विश्वासघाताचे राजकारण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेमध्ये दिले. दोनवेळा विधानसभेत विश्वासघाताने पराभव झाला असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना स्वत:साठी काहीही मागीतले नाही. सांगलीच्या विकासाच्या पंचसुत्रीच्या पूर्ततेची पूर्ण हमी घेवूनच ते भाजपवाशी झाले. त्यामुळे केवळ त्यांचे कार्यकर्तेच नव्हे तर जिरवा जीरवीच्या राजकारणाला कंटाळलेले कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आहेत.  सोज्वळ, संयमी आणि विकासाची दृष्टी असणारे लोकमान्य नेतृत्व म्हणूनच पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला आहे.

केवळ विकासाचा शब्द घेणारे, कोणताही कलंक नसणारे, शुध्द चारित्र्य आणि अभ्यासु नेतृत्व म्हणून येणार्‍या काळात भाजपचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज पाटील यांचा लोकसभेचे उमेदवार म्हणून विचार करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील  आणि प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे विधानसभा, विधान परिषद या ठिकाणी संधी मिळू शकते. त्यापेक्षा जास्त २०२९ ला लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो. असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

गेली १२ वर्षे सर्व शक्ती पणाला लावून कॉंग्रेस जिवंत ठेवली असताना विधानसभेच्या निवडणूकीत त्यांच्याबरोबर दोनवेळा विश्वासघात झाला. खासदार विशाल पाटील हे त्यांच्या सोयीनुसार भूमिका बदलत असतात. गरजेनुसार ते कधी अपक्ष तर कधी कॉंग्रेसचे नेते असल्याचे सांगतात. असा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणूकीत आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. कॉंग्रेसचे सहयोगी खादार म्हणून विशाल पाटील यांनी कॉंग्रेस उमेदवाराला साथ देणे आवश्यक होते परंतु त्यांनी त्यांच्या घराण्यातील अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. आणि आपला विश्वासघात केला. असा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला. येणार्‍या काळात असा विश्वासघात पुन्हा होणार नाही याची हमी कॉंग्रेसमधील कोणीही नेते द्यायाला तयार नाहीत. त्यातच दोन वेळा तुमचा पराभव झाला आहे आता तिसर्‍यांदा उघडपणे विरोध करून राजकारण संपवू, अशा प्रकारची विधाने होत आहेत. विश्वासघातकी संघर्षात खितपत पडण्यापेक्षा कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडून सांगलीचा विकास करावा, असा विचार करूनच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी दिले. प्रामाणिकपणे लढणार्‍या कार्यकर्त्याची विश्वासघाताचे राजकारण करून कुंचबना करणार्‍यांना कॉंग्रेस मोकळी सोडली आहे. असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये पृथ्वीराज पाटील यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता तर २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सुमारे ८५ हजार मते मिळाली. त्यामुळे त्यांच्यामागे जनमत आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यामातून ते नेहमीच जनतेमध्ये असतात. विधानसभेच्या पराभवानंतरही ते सदैव सक्रीय राहिले. महापूर व कोरोना काळात त्यांनी केलेलं काम लोकांनी लक्षात ठेवले आहे. त्यांनी सुरू केलेले धार्मिकी, सामाजिक उपक्रम अखंडपणे सुरू ठेवले. अजॉ पुराचे वातावरण झाले तर ते स्वतः पाण्यात उतरून पूरग्रस्त भागात मदतीसाठी धावून जातात.

कॉंग्रेचे विधानसभेचे उमेदवार भाजपमध्ये आल्यानंतर पुढे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. परंतु लोकांच्यासाठी अव्याहत झटणारे, लोकांच्या अडीअचणीमध्ये मदतीसाठी धावून जाणारे सोज्वळ, लोकप्रिय, स्वच्छप्रतिमेचे नेते अशी त्यांची ख्याती आहे. स्वत:साठी काहीही न मागता विकासाची पंचसुत्री समोर ठेवून त्याच्या पूर्ततेचा शब्द घेवून भाजपमध्ये प्रवेश करणारे कदाचित हे दुर्मिळ उदाहरण असेल. लोकांच्या विकासाची तळमळ आणि अभ्यासून नेते म्हणून त्यांचा सांगली लोकसभेचे उमेदवार म्हणून विचार भाजपचे वरिष्ठ नेते करू शकतात. पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेचा कोणताही हट्ट न धरता पक्ष देईल ती जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पृथ्वीराज पाटील भाजपकडून २०२९ ला लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. त्यामुळे सांगली विधानसभा क्षेत्रातील इच्छुकांचा त्यांना पाठींबा मिळत राहिल. असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजप हा शिस्त असणारा पक्ष असून गुणवत्तेनुसार पक्षात संधी दिले जाते. हा पक्षाचा इतिहास आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना पक्षाच्या तत्वांचा निश्‍चित फायदा होऊ शकतो.

Related Articles

Check Also
Close