तासगावात श्रींची समाजप्रबोधनपर विसर्जन मिरवणूक, सांगली शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील शैक्षणिक संकुलातील श्रींची विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहवर्धक व समाजप्रबोधनपर संदेश देणारी असल्याने सर्व तासगावकरांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.या मिरवणुकीमध्ये सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव शैक्षणिक संकुलातील राधा गोविंद मराठे बालशाळा,चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर व पटवर्धन कन्या प्रशाला तसेच श्री.वा.गोखले प्राथमिक शाळा दत्तनगर या शाळातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग या विसर्जन मिरवणुकीत होता.सदर विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन श्रींचे विधिवत पूजन व आरती बेदाणा व्यापारी हेमंत हिंगमिरे व सौ आदिती हेमंत हिंगमिरे तसेच संस्थेचे संचालक रविंद्र देवधर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक मुकुंद जोग, सुभाष बल्लाळ,सौ नीता जोशी व सौ शुभांगी धर्माधिकारी तसेच शालाधिक्षक योगेश खाडीलकर व मिलिंद औताडे तसेच सर्व शाळातील पर्यवेक्षक,शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुक पार पडली.या विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सजीव देखावे चित्ररथ रूपाने साकारले व पारंपारिक लेझीम- झांज पथकांनी मिरवणुकीत समाजप्रबोधना बरोबर रंगत देखील आणली.यावेळी ऑपरेशन सिंदूर,स्त्री- शिक्षण महत्व, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मवर्षावर आधारित आकर्षक देखावा साकारला होता,यामुळे तासगावकर मंत्रमुग्ध झाले. याचबरोबर सर्व शाळांचे आकर्षक झांज पथक,लेझीम पथक,ध्वज पथक तसेच टिपरी नृत्य इत्यादीमुळे मिरवणुकीत रंगत आली.यानंतर श्रींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करून विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर आदर्श ठेवण्यात आला. संपूर्ण तासगाव शहरातून निघालेल्या या शिस्तबद्ध व समाज प्रबोधनपर श्रींच्या मिरवणुकीने तासगावकरांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता.सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव शैक्षणिक संकुलातील श्रींची विसर्जन मिरवणूक तासगावकरांच्या कौतुकास पात्र ठरली व समाजप्रबोधन संदेश देणारीही ठरली.