मोटारसायकल चोरीप्रकरणी सांगली LCB ची संयुक्त कारवाई : दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या ४ गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून, एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी राहुल श्रीकांत सांकुखे, वय २० वर्षे, रा. वासुबे, ता. तासगाव, जि. सांगली याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
महिला पोलीस उप निरीक्षक तेजश्री पवार, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, सांगली यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन राहुल सांळुखे, रा. वासुंबे हा त्याचे साथीदारासोबत तासगाव ते ढवळी रोडवरील महादेव पाटील यांचे बंद पडलेल्या अपार्टमेंटच्या समोरील बाजुस चोरीच्या मोटार सायकली विक्री करणेकरीता थांबले असल्याची बातमी मिळाली.
सदर बातमीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे तासगाव ते ढवळी रोडवरील महादेव पाटील यांच्या बंद पडलेल्या अपार्टमेंटच्या परिसरात जावुन निगराणी करीत असता, तीन इसम संशयितरित्या मोटार सायकल जवळ थांबलेले दिसले. तसा त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गावे विचारता त्यानी त्यांची नावे १) राहुल श्रीकांत सांळुखे, वय २० वर्षे, रा. वासुंबे, ता. तासगाव, जि. सांगली २) बाल अपचारी ३) बाल अपचारी अशी असल्याची सांगितले. सपोनि पंकज पवार यांनी मिळाले बातमीची थोडक्यात हकीकत सांगुन अंगझडतीचा उद्देश कळवुन पंचासमक्ष त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्यांनी त्याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. सपोनि पंकज पवार यांनी राहुल सांळुखे यास अधिक विश्वासात घेवून सदर मोटार सायकलबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरची मोटार सायकल ही तुरची येथुन चोरी केलेली असून अपार्टमेंटचे आडोशास चोरीच्या तीन मोटार सायकल असून त्या सावळज आणि कुंडल येथून त्याचे सोबत असलेल्या दोनही बाल अपचारी यांचे मदतीने चोरी केलेल्या असून सदरच्या गोटार सायकल विक्री करणेकरीता आणल्या असल्याची कबुली दिली.
सदर ठिकाणी मिळालेल्या मोटार सायकलबाबत सदर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता तासगाव य कुंडल पोलीस ठाणेस या मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने लागलीच सपोनि पंकज पवार यांनी दोन पंचासमक्ष सदरच्या मोटार सायकल पंचनाम्याने जप्त केल्या.
सदरचा जप्त मुद्देमाल, वाहन चोरी करणारे संशयित आरोपी व बाल अपचारी यांना त्यांचे नातेवाईकासह तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास तासगाव व कुंडल पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली,
सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली, महिला पोलीस उप निरीक्षक तेजश्री पवार, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, सांगली. पोहेकों / सागर टिंगरे, द-याप्पा बंडगर, संदिप गुरव, अनिरशा फकीर, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलावडे, नागेश खरात, अमर नरळे, सतिश माने, मछिंद्र बर्डे, उदय माळी, पोकों / केरबा चव्हाण, विक्रम खोत, स्था. गु. अ. शाखा, सांगली, पोहेकों / अभिजीत गायकवाड, संग्राम गायकवाड, महेश गायकवाड, पोकों / प्रवीण शिंदे, चालक सपोफौ / राजेद्र पवार, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, सांगली. पोकों / अभिजित पाटील व अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे