आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टर दांपत्याची १ कोटींहून जास्त फसवणूक ; तीन आरोपी गजाआड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टर दांपत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ०३ आरोपी जेरबंद करुन त्यांचेकडून एकूण १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व कवठेमहांकाळ पोलीस पथकांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी
१) दिक्षा राष्ट्रपाल भोसले वय-२५ वर्षे राहणार-काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-१, चिंचवड, पुणे.
२) पार्थ महेश मोहिते वय-२५ वर्षे राहणार-मंगळवार पेठ, कोल्हापूर.
(३) साई दिपक मोहिते वय-२३ वर्षे राहणार-प्रगतीनगर, पांचगाव ता-करवीर जि-कोल्हापूर.
*परागंदा संशयित आरोपी*
४) महेश रघुनाथ शिंदे राहणार-जयसिंगपूर जि-कोल्हापूर सध्या राहणार- घाटकोपर, मुंबई (परागंदा)
५) अक्षय लोहार राहणार-संकेश्वर जि-बेळगाव राज्य-कर्नाटक (परागंदा)
६) शकील पटेल राहणार-गडहिंग्लज जि-कोल्हापूर (परागंदा)
७) आदित्य गोरे राहणार-रुकडी ता-हातकणंगले जि-कोल्हापूर (परागंदा)
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
दि. १४.०९.२०२५ रोजी रात्री ११.०० वा. ते १२.०० वाजणेचे दरम्यान कवठेमहांकाळ येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घरी अनोळखी ३ पुरुष व १ महिला यांनी इनकम टॅक्स ऑफीस, मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करुन फिर्यादी यांचेकडील एकूण १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व १५,६०,०००/- रुपये रोख रक्कमेची फसवणूक करून ते घेऊन गेल्याने त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी यानी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत श्री. सचिन थोरबोले यांनी सदर गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेऊन वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
या गुन्हयांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्यांचा तपास सुरु केला. महाराष्ट्रात अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी कोठे घडले आहेत व त्यातील आरोपी सध्या कोठे आहेत याबाबत गाहिती संकलित करुन त्यांचा या गुन्हयातील सहभाग तपासला गेला. परतुं त्यातून गुन्हा उघडकीस येणेसाठी आवश्यक ती माहिती प्राप्त झाली नाही.
घटनेच्या ठिकाणाहून फिर्यादी यांचेकडील सीसीटीव्हीचा डी. व्ही आर आरोपीनी स्वतः सोबत नेला असल्याने आरोपीबाबत माहिती मिळण्यासाठी संशयीत आरोपीची रेखाचित्रे तयार करण्यात आली. तसेच घटनास्थळ व आरोपीच्या येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करुन तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.
यादरम्यान सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, नितीन सावंत, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे कडील दत्तात्रय कोळेकर व पोलीस उप-निरीक्षक विनायक मासाळ व पोलीस स्टाफ यांची पथके तयार करुन सोलापूर, मुंबई, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक राज्य येथे रवाना करुन आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. आरोपींनी स्वतः चे अस्तित्व लपवणेबाबत बरीच काळजी घेतली असल्याने गुन्हयांची उकल करणे आव्हानात्मक झाले होते.
तरीही कसोशीने प्रयत्न करुन तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर गुन्हयातील संशयीत महिला ही पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व स्था. गु. शा. कडील स्टाफ यांचे पथक तयार करुन पुणे येथे जाऊन महिला नामे दिक्षा राष्ट्रपाल भोसले वय-२५ वर्षे राहणार-काकडे पार्क, बिल्डिंग नं. एफ-१, चिचवड, पुणे हिला ताब्यात घेऊन तिचेकडे तपास केला असता तिने वर दाखल गुन्हा तिचे इतर साथीदारासोबत मिळून केला असल्याचे कबूल करून तिचे इतर साथीदारांचे ठावठिकाण्याबाबत उपयुक्त माहिती दिली.
तात्काळ सदर संशयीत महिलेने दिलेल्या माहिती प्रमाणे इतर आरोपीचा शोध घेणेसाठी वेगवेगळी पथके रवाना करुन त्यांचा शोध घेत असताना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे संशयीत आरोपी नामे पार्थ महेश मोहिते वय-२५ वर्षे राहणार-मंगळवार पेठ, कोल्हापूर व साई दिपक मोहिते वय-२३ वर्षे राहणार-प्रगतीनगर, पांचगाव ता-करवीर जि-कोल्हापूर यांना सापळा रचून शिताफीने हातकणंगले जि-कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींनी गुन्हयाची कबूली देऊन त्यांचेकडे असलेली बेंग तपासली असता त्यामध्ये एकूण १,४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे व रोख रक्कम १५,०५,०००/- रुपये मिळून आले. सदर सोने व रोख रक्कम याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचे दागिने व रोख रक्कम ही कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांना आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करुन त्यांचेकडून आणली असलेबाबत सांगितले. तात्काळ दोन पंचासमक्ष सदरचे सोने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
यातील परांगदा आरोपी क्रमांक ४ हा मूळचा जयसिंगपूर येथील राहणारा असून सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. तो व त्यांचे परिचयाचे इतर साथीदार आरोपी क्रमांक ५ व ६ यांनी सदर गुन्हयाचे नियोजन करुन त्यामध्ये त्याचे परिचयाचे आरोपी क्रमांक १ व २ यांना सामील करून घेतले. यातील आरोपी क्रमांक १, ४, ५ व ६ यांनी फिर्यादी यांचे घरी जाऊन ते आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांचेकडील वरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन गेले होते. यासाठी या आरोपींनी स्वतःबाबत गोपनीयता ठेवून सांगली येथील रिक्षा चालकांच्या मदतीने सांगली येथील इनोव्हा गाडी भाडयाने घेतली होती सदर भाडयाची इनोव्हा गाडी त्यांनी गुन्हा करताना व तेथून निघून जाताना वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गाडी पोलीसांना मिळून आली असून सदर गाडीचा ड्रायव्हर व रिक्षाचालक यांना या गुन्हयाबाबत काही माहिती नसल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी यांनी गुन्हा करुन जाताना सदरची इनोव्हा गाडी सांगोला जि-सोलापूर येथे सोडून तेथून बसने प्रवास करुन ते गोहोळ जि-सोलापूर येथे गेले होते. यातील आरोपी क्रमांक २, ३ व ७ हे गोहोळ येथे पोहोचताच आरोपीनी फसवणूक करुन आणलेली सोने व रोख रक्कम यांचे ताब्यात दिले होते त्यानंतर सर्व आरोपी हे वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते.
सदर गंभीर गुन्हा हा कोणताही पुरावा नसताना कसोशीने प्रयत्न करुन ६० तासात उघडकीस आणण्यात सांगली पोलीस दलाला यश आले असून गुन्हयातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्हयातील इतर परागंदा आरोपी यांचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत श्री. सचिन थोरबोले
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे, सांगली
पोलीस उप-निरीक्षक तेजश्री पवार ए.एच.टी. यू सांगली
पोलीस उप-निरीक्षक विनायक मासाळ कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
सपोफौ/स्वप्ना गराडे, पोहवा / सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सतिश गाने, संदीप गुरव, मच्छिद्र बडे, उदयसिंह गाळी, अनिल कोळेकर, अगर नरळे, आगसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, इम्रान गुल्ला, अतुल माने, अमोल ऐदाले पोकों / केरूबा चव्हाण, विक्रम खोत.
पोना/नागेश मासाळ, पोकों/सिध्दराम कुंभार, अभिजीत कासार, शितल जाधव, स्वप्निल पाटील
कवठेमहांकाळ पोलीस ठाणे. पोकों/ अभिजीत पाटील, अजय पाटील, अजय बेंद्रे, शांता कोळी सायबर पोलीस ठाणे.