लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली कडून नागरीकांना लाचेची तक्रार देण्याकरीता फोन नंबर, टोल फ्री क्रमांक व कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे. सदर क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली पोलीस उप-अधीक्षक यास्मिन इनामदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानीत मंडळे/ संस्था यांचे अधिकारी/कर्मचारी, महापालिका / नगरपालिका /जिल्हा परिषद, ग्रामपंचायत येथील अधिकारी, कर्मचारी इत्यादी लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, बदाम चौक, पोलीस लाईन शेजारी, सांगली येथील फोन नंबर 0233-2373095, टोल फ्री क्रमांक 1064, कायमस्वरूपी नवीन जारी करण्यात आलेला मोबाईल क्रमांक 9404041064 या क्रमांकावर करावी असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.



