प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील ४ आरोपी अटक; १० लाख ३१,६३०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत ; एकूण १३ गुन्हे उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील ४ आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १० लाख ३१ हजार ६३०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.एकूण त्यांचे १३ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी  ही कारवाई केली.

आरोपीचे नाव

१) आकाश कल्लाप्पा काळे, वय २७ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली.

२) सचिन अभिमान काळे, वय ३२ वर्षे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापुर.

दत्ता संपत चव्हाण, वय ५४ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली.

३) ४) गोविंद राजु काळे, वय २८ वर्षे, रा. उमराणी रोड, जत, ता. जत, जि. सांगली.

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.

त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोकॉ/ प्रमोद साखरपे, पोहेकॉ संजय पाटील, आणि पोहेकॉ/हणमंत लोहार यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीव्दारे माहिती मिळाली की, इस्लामपुर पोलीस ठाणे गु.र.नं. २४४/२०२२५ बी एन एस कलम ३०५ (अ), ३०५ (इ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा हा १) आकाश कल्लाप्पा काळे, वय २७ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली. २) सचिन अभिमान काळे, वय ३२ वर्षे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापुर. ३) दत्ता संपत चव्हाण, वय ५४ वर्षे, रा. एकतानगर, सातारा रोड, जत, ता. जत, जि. सांगली. आणि ४) गोविंद राजु काळे, वय २८ वर्षे, रा. उमराणी रोड, जत, ता. जत, जि. सांगली यांनी केला आहे.

सहा पोलीस निरीक्षक सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांचे पथकास मिळाले बातमीप्रमाणे सदर चारही इसमांना चौकशी कामी ताब्यात घेवून त्यांचेकडे सदर घरफोडी चोरीच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी त्यांचे पथकामार्फत कौशल्यपुर्ण तपास केलेनंतर आकाश काळे याने सांगितले की, घरफोडी चोरी करणेकरीता आय २० चार चाकी वाहन क्र. एम एच १२ पी झेड २१९८ वाहनातुन तो आणि त्याचेसोबत असले दत्ता चव्हाण, सचिन काळे आणि गोविंद काळे यांनी मिळून वरील प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

सदर बाबत नमुद पोलीस ठाणेंचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे चांदिचे दागिने, गुन्हयात वापरलेले वाहन व गुन्हा करताना वापरलेली हत्यारे पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत.

सदरचे चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचेवर यापूर्वी सांगली जिल्हा, सोलापुर जिल्हा, कर्नाटक आणि तेलगंणा राज्यात दरोडा, घरफोडी चोरी यासारखे मालमत्तेविरुद्धचे व शरिराविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.

सदरचे चारही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपुर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास इस्लामपुर पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहवा / संजय पाटील, सुर्यकांत सांळुखे, हणमंत लोहार, संदीप पाटील, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, बसवराज शिरगुप्पी, चापोहेकॉ/ शिवाजी शिद. पोकॉ/ प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, केरुबा चव्हाण, अभिजीत माळकर, पवन सदामते, संकेत कानडे, सुरज थोरात, पोहेकॉ / संदीप पाटील, प्रवीण धोत्रे कुरळप पोलीस ठाणे. पोहेकॉ । करण परदेशी, पोकॉ अजय पाटील, अभिजीत पाटील, मपोकों / शांता कोळी, सायबर पोलीस ठाणे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!