प्रतिष्ठा न्यूज

पुण्यातील Bentley systems या कंपनी मार्फत वासुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणक व प्रोजेक्टर भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्र न्यान व अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणुन पुण्यातील Bentley systems या कंपनी मार्फत सी एस आर फंडातून वासुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणक व projector असा सुमारे दोन लाखाचा संच देण्यात आला. यासाठी कंपनी मध्ये कार्यरत संगणक अभियंता वैभव वल्लभदास शेळके यांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेतील शिक्षक नवनाथ पोल,ग्रामपंचायत सदस्य विकास मस्के, शिक्षण समिती ईतर सदस्य उपस्थित होते. कंपनी मार्फत आजपर्यंत सरस्वती नगर, लोंढे, आरवडे ,jarandi,तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील माळी वस्ती, तिरंगी या शाळांनाही projector देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगत शिक्षणाची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी कंपनीला धन्यवाद देत आहेत.