टीईटीसंदर्भात धडाडीच्या भूमिकेबद्दल तालुका साहित्यनिर्मिती संयोजकांकडून शशिकांत पाटील यांचा सन्मान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती सहसरचिटणीस व परिषदेचे जिल्हा तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांचा तासगाव तालुका शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजकांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा सावर्डेच्या सभागृहामध्ये जिल्हाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व समन्वय समिती सहचिटणीस या नात्याने मुक मोर्चाचे आयोजन करून शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल सत्कार करण्यात आला .
शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांचेकडून TET संदर्भात महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार याची ग्वाही मूकमोर्चाच्या इशाऱ्यानंतर नुकतीच देण्यात आली आहे.
दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता १ ली ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे.यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन सांगली जिल्ह्या मध्ये सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली अध्यक्ष महेश शरणाथे, माणिकराव पाटील,सयाजीराव पाटील, समन्वय समिती सरचिटणीस शशिकांत पाटील, संजय साबळे, म.ज. तथा महादेव जगन्नाथ पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर मूक मोर्चाचे आयोजन केले होते
मोर्चाची गांभीर्याने व संवेदनशीपणे दखल घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री.पंकज भोयर साहेब यांनी रवी भवन नागपूर येथे राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधीची बैठक बोलावली होती.बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण सचिव माननीय रणजीतसिंह देओल साहेब,शिक्षण आयुक्त माननीय श्री.सच्छिद्र प्रताप सिंह ,शिक्षण संचालक शरद गोसावी उपस्थित होते. त्यात यशस्वी तोडगा निघाल्याबद्दल शशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र, सांगली जिल्हा व तासगाव तालुक्यामध्ये शशिकांत पाटील यांचे कार्य शिक्षकांना न्याय देणारे असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,असे गौरवोद्गार जिल्हा परिषद शाळा सावर्डे सभागृहामध्ये तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य स्पर्धेप्रसंगी सत्कार करताना सावर्डे मुख्याध्यापक मोहन डांगे यांनी काढले.
तासगाव तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मनीषा शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सावर्डे शाळेचे पदवीधर शिक्षक संजय शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी,स्नेहा मंडले ,नवनाथ पोळ, सुधाकर बनसोडे, मुख्याध्यापक दादा माने, राजकुमार चुनगुने, बीआरसी चे विषयतज्ञ वैभव बंडगर,वैभव आंबी,नितीन रास्ते, आशिष भंडारे व बहुसंख्येने तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.