प्रतिष्ठा न्यूज

कश्यप खाखरिया, सौमित्र केळकर, व आदित्य कोळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मनपा स्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत विजेते

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : तरुण भारत स्टेडियम येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२५ पार पडल्या. या स्पर्धा क्रीडा अधिकारी वरुटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे यांच्या संयोजनाने झाल्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगट १७ वर्षाखालील वयोगट व १९ वर्षाखाली वयोगट अशा तीन वयोगटांचा समावेश होता. महानगरपालिकेतील विविध शाळांमधील जवळपास ३२० हून अधिक मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.

१४ वर्षाखालील मुले :- या वयोगटाच्या नऊ फेऱ्या झाल्या व निकाल पुढीलप्रमाणे

प्रथम – कश्यप खाखारिया, द्वितीय – मोटे आशिष,

तृतीय – मंथन शहा, चतुर्थ – मिहीर पिंपरकर,

पंचम – चिंदे समर्थ.

१७ वर्षाखालील वयोगट :- नऊ फेऱ्या झाल्या व निकाल पुढील प्रमाणे

प्रथम – सौमित्र केळकर, द्वितीय – अथर्व अलदार, तृतीय – खवाट तेजस, चतुर्थ – पिसे अथर्व, पंचम – गुसाई अभयसिंह

१९ वर्षाखालील मुले:- या गटामध्ये पाच फेऱ्या घेण्यात आला व निकाल पुढील प्रमाणे प्रथम – आदित्य कोळी,

द्वितीय – हर्ष शेट्टी, तृतीय – लट्टी आदित्य, चतुर्थ – अयाज शिरगावे, पंचम – अकिब मुल्ला.

या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटने कडून केपीज चेस अकॅडमीच्या संचालिका आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर यांनी काम पाहिले. तसेच राष्ट्रीय पंच विजयकुमार माने, शिवप्रसाद कोकणे, राज्य पंच सदानंद चोथे, मोहिनीराज डांगे, योगेश कुंभार. त्याचबरोबर लोहाना, अरुणा कुलकर्णी पूजा धनवडे, सुचेता देशपांडे, स्टीफन काकी, अजितकुमार कोळी यांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडले.