प्रतिष्ठा न्यूज

जिल्ह्याचे पालकमंत्री टीका टिप्पनीत व्यस्त, सत्ताधाऱ्यांना रस्त्यातील खड्डे दिसेनात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अख्ख्या जिल्ह्यात रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ता अशी परस्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र टीका टिप्पनी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर पडलेले मोठं मोठे खड्डे दिसत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तासगाव ते सांगली,तासगाव ते मिरज,तासगाव ते विटा या प्रमुख रस्त्यावर प्रचंड लहान मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या प्रमुख मार्गावरील दुचाकी चारचाकी वाहकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.नव्याने डांबरीकरण केलेले काम अत्यन्त निकृष्ट झाल्याने रस्ता होवूनही खड्डे पडले आहेत.दुचाकी स्वारांचे खड्डा चुकविण्यासाठी मागून येणाऱ्या वाहनांच्या आडवे जावून लहान मोठे अपघात झाले आहेत.या सर्वच रोडवर कोल्ड स्टोअरेज,तसेच अन्य मोठे व्यवसाय असल्याने चार चाकी वाहनांची वर्दळ अधिक असते.सकाळ सत्रात कामगार,शाळा,कॉलेजचे विद्यार्थी यांची दुचाकीवरून वर्दळही अधिक असते.खड्डेमय रस्तामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.काही ठिकाणी एक एक फूटाचे खोल खड्डे आहेत.त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.खराब रस्त्यावरून जाताना हादऱ्यामुळे पडून अनेक महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.