प्रतिष्ठा न्यूज

दलित महासंघाच्या उपोषणाला यश, बांधकाम विभागाची परवानगी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सावळज गावातून जाणारा राज्य मार्ग क्रं.161 च्या माता रमाई चौकपासून पुढील भागात रखडलेल्या गटारीचे काम ग्रामपंचायतीने करावे.त्यास हरकत नसल्यांचे पत्र सा.बां.विभागाने देताच ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.तेंव्हा सा.बां.उपविभागाचे शाखा अभियंता दत्ता पाटील यांचे हस्ते सरबत पिऊन दलित महासंघ (मोहिते गट) राज्याध्यक्ष प्रशांत केदार,जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी,तालुकाध्यक्षा प्रमिलाताई गावडे यांनी उपोषण सोडले.याबाबत अधीक माहिती अशी कि,सावळज गाव हद्दीतून डोंगरसोनी-सावळज-तासगाव हा राज्य मार्ग क्रं-161 जातो.सावळज हद्दीतील संविधान चौक ते माता रमाई चौक या भागात रस्त्याच्या एका बाजूला गटारीचे अर्धवट काम करण्यात आले आहे.परंतु माता रमाई चौकापसून पुढील भागात गटर काम रखडलेले होते.परिणामी माता रमाई चौकात अर्धवट केलेली गटर तुंबून राहिल्याने दूषित सांडपाणी नागरिकांच्या घरात उलट दिशेने प्रवाही झाले.तसेच परिसरातील नागरिक डासांमुळे ताप,थंडी,निमोनिया,डेंगूसदृश्य इतर आजारांना सातत्याने बळी पडत आहेत.ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातील समायोजन अभावी गटर कामाचा प्रश्न रखडलेला होता.माता रमाई चौकापासून पुढील भागात रखडलेले गटर काम तात्काळ सुरू करावे.अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना गटारीच्या दूषित पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा उपोषणकर्ते राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला होता.याची गंभीर दखल घेत सा.बां.विभागाचे सहाय्यक अभियंता आ.ज.हुद्दार यांनी माता रमाई चौकापासून पुढील भागात रखडलेल्या गटारीचे काम करण्यास तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत प्रशासनास करण्यास परवानगी दिली आहे.तेंव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करीत पाईप टाकण्याचे कामकाज सुरू केले आहे.दलित महासंघाच्या मागणीप्रमाणे गटारीचे काम करण्यासाठी कामकाज व कार्यवाही सुरू झाल्याने दलित महासंघाच्या आमरण उपोषणास यश मिळाले आहे.गेली अनेक वर्षे रखडलेल्या गटारीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.तसेच दलित महासंघाचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्या उपोषणाच्या रेट्याने सदर काम झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याचे सावळज ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.