सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्याचा निषेध; उत्तम कांबळे दादांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही, त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शन केले. या निदर्शनात तालुका अध्यक्ष, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपस्थित कार्यकर्त्यांनी “न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला”, “भूषण गवई जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. कार्यकर्त्यांच्या निदर्शनातून न्यायव्यवस्थेवरील हल्ल्याची गंभीरता समोर आली आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
निवेदनात म्हटले आहे की, न्यायपालिका ही भारतीय लोकशाही आणि संविधानाचा प्राण आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच या घटनेमागील शक्तींचा शोध घेऊन संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गुणवंत नागटीळे, जिल्हा संघटक राजेंद्र टिपकुरलीकर, जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर,मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे, शहराध्यक्ष सुखदेव बुद्ध्याळकर, शहर उपाध्यक्ष विकी कांबळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के , युवक आखाडी शहराध्यक्ष किरण निकाळजे, शहर कार्याध्यक्ष राहुल कांबळे, युवा कार्यकर्ता योगेश आजाटे, करवीर संघटक नामदेव कोथळीकर , गगनबावडा अध्यक्ष तानाजी कांबळे, हातकणंगले उपाध्यक्ष अनिल कांबळे, शुभम कांबळे उपाध्यक्ष हातकणंगले , संतोष कांबळे युवा उपाध्यक्ष , अमर कांबळे सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.