सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्यास त्वरित अटक करून कडक कारवाई करावी – उत्तमराव कांबळे (आबा)

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारताचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर न्यायालयाच्या परिसरात राकेश किशोर या वकिलाने हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे महात्मा गांधी पुतळा समोर तीव्र आंदोलन करण्यात आले व घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी यांच्यावर हल्ला करणारा राकेश किशोर याची सनात रद्द करावी व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली
यावेळी उत्तमराव कांबळे, तानाजी गडदे, आयुब बारगीर, डाॅ.शुभम जाधव, महालिंग हेगडे, विद्याताई कांबळे, सुरेखा जाधव, सुरेखा सातपुते, छाया पांढरे, प्रणवी पाटील, तेजश्री अवघडे, अकबर शेख, फिरोज मुल्ला, विनायक सौदे, रतन तोडकर, सरफराज शेख, अभिजीत रांजणे, विजय जाधव, संजय शिंगारे, भारत चौगुले, समशेर चौगुले, आदर्श कांबळे, विनायक हेगडे, अमित चव्हाण आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे कार्यकर्ते उपस्थित होते.