प्रतिष्ठा न्यूज

इचलकरंजी महानगरपालिकेत सुरक्षारक्षक कराराच्या विरोधात ठिय्या आंदोलन नागरिक मंचाचा निषेध, “सुरक्षारक्षक हटवा – कोट्यावधी वाचवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेने सुरक्षारक्षकांच्या करारावर खर्च करण्यात येत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विरोधात इचलकरंजी नागरिक मंच तर्फे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात असल्याचा आरोप करत नागरिक मंचने तातडीने सुरक्षारक्षकांचा करार थांबवावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी “सुरक्षारक्षक हटवा – कोट्यावधी वाचवा”, “सुरक्षारक्षकाचे काय काम? अधिकाऱ्यांचे घरकाम?”, “जनतेच्या सेवकाला सुरक्षारक्षक कशाला?”आयुक्तांचा रुबाब आमदार खासदारांपेक्षा भारी, अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

या ठिय्या आंदोलनात उमेश पाटील,शितल मगदुम,अमोल मोरे,राजुदादा आरगे,डॉ. सुप्रिया माने,मीना कासार,कल्पना माळी,सुषमा साळुंखे,सलमान रझा खान,अमित बियाणी,राजू कोन्नुर,श्रीकांत कासार,शितल लिगाडे,विद्यासागर चराटे, सिद्धार्थ इंगवले,हरीश देवाडिगा, दीपक जाधव,सचिन बाबर, बाळू भंडारी,महेंद्र जाधव, अमोल ढवळे,दीपक पंडित, नितीन ठिगळे,रामचंद्र निमणकर,सुहास पाटील, अभिजीत पटवा आदी सहभागी झाले होते.

तर या आंदोलनास संभाजी सूर्यवंशी,मंगेश बावचे,प्रदीप माळगे,संदीप सुतार,प्रवीण पवार,शशांक बावचकर,युवराज शिंगाडे,प्रमोद खुडे,झाकीर जमादार,मनोज हिंगमिरे,सदा मलाबादे,रावसाहेब निर्मळे, अशोक काळे,अनिल नलावडे, प्रकाश पुजारी,राजू पाटील, अभिजीत रवंदे,बाळासाहेब कलागते,प्रकाश मोरबाळे, दिलीप मुथा,रवी वासुदेव, गजानन शिरगावे,संदीप पाटील, सुशांत कोटगी,सचिन अतिग्रे यांनी पाठिंबा दर्शविला.

नागरिक मंचने “महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सुरक्षारक्षक नेमणुकीवर होणारा खर्च थांबवावा. अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल.” असे यादरम्यान दिलेल्या इशाऱ्यात म्हंटले आहे.