सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकाराचा जाहीर निषेध ; भारतीय अमृत महोत्सव समिती व संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात देशाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर झालेला गंभीर प्रहार आहे. या भ्याड कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असे मत भारतीय संविधान अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य बापूसाहेब माने यांनी व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले न्यायव्यवस्था हीच लोकशाहीची खरी हमी आहे आणि त्या व्यवस्थेचे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या व्यक्तीवरच जर अशा प्रकारचा हल्ला झाला, तर तो संपूर्ण राष्ट्रासाठी चिंताजनक आहे. लोकशाहीच्या पाया रचणाऱ्या प्रमुख खांबांमध्ये न्यायव्यवस्था ही सर्वात महत्त्वाची आहे. भारतीय संविधान, कायदा आणि लोकशाही व्यवस्थेवरच झालेला थेट प्रहार आहे. असा हल्ला हा न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा डागाळण्याचा, समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा, तसेच न्यायावरचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे. घटनेत सामील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
यावेळी संविधान अमृत महोत्सव समितीचे समन्वयक आनंदराव कांबळे उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे प्राचार्य गौतम शिंगे रामहरी ठोंबरे अमोल ओवाळे डॉ नितीन गोंधळे महेश साळुंखे विद्याताई कांबळे धनराज खांडेकर पत्रकार शिवाजी कांबळे चेतन कदम अशोक मोहिते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.