प्रतिष्ठा न्यूज

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्था, कोल्हापूर आणि बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया यांचे वतीने कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिरात 209 रक्तदात्यांचे रक्तदान रक्तदान

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर आणि बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मा. कौस्तुभ गावडे म्हणाले, रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान केल्यामुळे एखाद्यास जीवदान तर मिळतेच पण त्याचबरोबर एका सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधानही मिळते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा.हितेंद्र साळुंखे म्हणाले,बॉम्बे ब्लड ग्रूप हा दुर्मिळ रक्तगट असून गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळविण्यासाठी 9970018001 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. श्री सुहास पाटील म्हणाले, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या यांच्या विचाराने आम्ही महाराष्ट्रात शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकीने आम्ही गरीब गरजू रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदानाचे काम करतो आहे … असे म्हणाले
या शिबिराचे आयोजन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्था सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी 200 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक भान जपले आहे. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्याला स्मार्ट वॉच, एअर बड, पेन ड्राईव्ह् यासारख्या भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे स्वागत पतसंस्थेचे संचालक श्री. सुहास पाटील यांनी केले तर आभार श्री. विनोद पन्हाळकर यांनी मानले. सदर शिबिराचे आयोजन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवन या ठिकाणी करण्यात आले. यावेळी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, महाराष्ट्र या संघटनेचे विक्रम यादव, किर्ती कांबळे, सूरज देशमुख, ज्योती माने, नयुब मोमीन, सुहास पाटील आणि नर्सिंग स्टाफ यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व संचालक व स्टाफ,मा.मुरलीधर गावडे साहेब, सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य पी.एम.हाके, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य विरेन भिर्डी, एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले, लेप्टनंट जितेंद्र भरमगोंडा, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील उपस्थिती होते. या शिबीरात संस्था परिसरातील गुरुदेव कार्यकर्ते, आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीं यांनी रक्तदान केले.