प्रतिष्ठा न्यूज

श्री भैरवनाथ स्पोर्टस्च्या खेळाडूंची नऊ पदकांची कमाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : डेरवण येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत श्री भैरवनाथ स्पोर्टस् फाउंडेशन बामणोळीच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदक, दोन रजतपदक आणि तीन कांस्यपदके अशा एकूण नऊ पदकांची कमाई केली. यामध्ये विविध वयोगटात आदित्य चौगुले बांबू उडी सुवर्ण पदक, सुप्रिया अन्सार – बांबू उडी – सुवर्णपदक, ऋतुजा माने ३ किमी चालणे सुवर्णपदक, समीक्षा तोडकर – बांबू उडी सुवर्णपदक, लक्ष्मी मोटे – बांबू उडी – रजत पदक व ११० मीटर अडथळा शर्यत – रजत पदक, सूरज कुशवाह पाच किलोमीटर चालणे रजत पदक, सुयोग सोलनकर बांबू उडी कांस्यपदक आणि वैदेही झरे बांबू उडी कास्यपदक यांनी नऊ पदकांवर आपले नाव कोरले आहे. प्रशिक्षक प्रशांत बामणे यांनी खेळाडूंनी अहोरात्र मेहनत घेऊन ही पदके मिळवली आहेत. आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे नमूद केले.