प्रतिष्ठा न्यूज

माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्या विरोध तक्रार दाखल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एका यूट्यूब चैनल वर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा मुस्तफा मुलानी ( मौलाना, मुस्लिम धर्म प्रसारक) याच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी यांनी सांगली शहर पोलीस ठाणे तक्रार दाखल केली.

शिवप्रतापाचे  अफजल खान वधाचे शिल्प तातडीने बसवा या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी जाण्यासंदर्भात  हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व पदाधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली होती त्याची बातमी यूट्यूब चैनल ने प्रसारित केली असताना  हिंदू एकता आंदोलनाच्या बातमी ला मुस्तफा मुलानी ( मौलाना, मुस्लिम धर्म प्रसारक) या जिहाद्याने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना “या कुत्र्याला हाणल पाहिचे” अशा शब्दात राग/चीड व्यक्त करून अफजलखाना वरील त्याचे असलेले प्रेम दाखवले आहे. त्याच्या विरोधात हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी आक्रमक होऊन सांगली शहर पोलीस ठाणे येथे मुस्तफा मुलानी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देऊन कारवाईची मागणी केली.
यावेळी हिंदू एकता आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्र वर चालून आलेल्या मुगलाचा सरदार अफजल खानाला मानणारा हा मुस्तफा मुलानी हा जिहादी प्रवीत्तीचा अतिरेकीच व देशद्रोहीच आहे.
यावेळी मनोज साळुंखे म्हणाले की,  मुस्तफा मुलानी सारख्या मुघली मानसिकतेच्या पाठीशी कोण उभे आहे. याला कोणती जहादि मानसिकता/ संघटना आर्थिक सपोर्ट करत आहे. समाजातील वातावरण बिघडण्याचे काम करण्यासाठी कोणती ताकद याच्या पाठीशी उभी आहे याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच भविष्यात हिंदू एकता आंदोलनाचे  प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्यावर हल्ला झाला तर सदर मुस्तफा मुलानी यास जबाबदार धरण्यात यावे. व त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
यावेळी मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, अरविंद येतनाळे, गजानन माने, सुमित शिंगे, दिग्विजय शिंदे, शुभम गवळी, अनिकेत आंबरुळे, अनिकेत कुंभार, शांताराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.