स्व. श्रीमती राजमती यशवंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगलीत रंगणार बुद्धिबळ महोत्सव…

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : बुद्धिबळ महोत्सव हा रविवार ९ नोव्हेंबर रोजी जैन कच्छी भवन, राम मंदिर चौक सांगली येथे ८ वर्षे , १२ वर्षे व १६ वर्षाखालील तब्बल तीन स्पर्धा एकाच वेळी पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. माजी नगरसेवक उदयजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केपीज चेस अकॅडेमी, सांगली आणि विश्वाशांती क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
८ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा – एकूण बक्षिसे – ६५, ट्रॉफी – ३०, मेडल्स – ३५,(सदर स्पर्धा ही ०१/०१/२०१७ नंतर जन्मलेले खेळाडूंसाठी आहे)
१२ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा बक्षिसे – ८०, ट्रॉफी – ३० मेडल्स – ५० (सदर स्पर्धा हि ०१/०१/२०१३ नंतर जन्मलेले खेळाडूंसाठी आहे) १६ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा – एकूण बक्षिसे – ९०, ट्रॉफी – ३५, मेडल्स – ५५ (सदर स्पर्धा हि ०१/०१/२००९ नंतर जन्मलेले खेळाडूंसाठी आहे) महत्वाचे म्हणजे या तिन्हीपैकी एकच स्पर्धा एका खेळाडूला खेळता येणार आहे. सदर महोत्सव एकदिवसीय असून जलद स्वरूपात होणार आहे. या स्पर्धेमध्ये बक्षीसांची अक्षरशः लयलूट करण्यात आली आहे. २४५ पेक्षा जास्त बक्षिसे देण्यात येणार आहेत. ट्रॉफी आणि मेडल्स सोबतच सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट इन्स्टिटयूट (शाळा/अकॅडेमी) – १० ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असणार आहे. या स्पर्धेची नावनोंदणी अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. स्पर्धा प्रकार हा जलद बुद्धिबळ असून, ८ फेऱ्या, स्विस सिस्टिम असणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी सकाळी ९:३० वाजेपर्यंत उपस्थित रहायचे आहे. यासाठी वेळ मर्यादा १० मिनिट २ सेकंड असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश स्वीकारला जाईल. अधिक माहितीसाठी
८३९००१८३०८/ ७५८८८४२६०५ या क्रमांकावर संपर्क साधावा. नाव नोंदणीसाठी इच्छुक खेळाडूंनी केपीज चेस अकॅडमीला संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा आयोजक उदय पवार माजी नगरसेवक, सांगली आणि केपीज चेस अकॅडेमीच्या संचालिका आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर यांनी केले आहे.