प्रतिष्ठा न्यूज

शहाजी महाविद्यालयात ‘अक्वेरियम मॅनेजमेंट अँड कन्स्ट्रक्शन’ विषयावर अग्रणी कार्यशाळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर (दि न्यू कॉलेज क्लस्टर) प्राणिशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने “Aquarium Management and Construction” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या लीड कॉलेज योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री. मानसिंग बोंद्रे (दादा) प्रमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. पी. आडाव, लायब्रियन – द न्यू कॉलेज, कोल्हापूर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी भूषविले.

या प्रसंगी डॉ. आर. डी. मांडणीकर (समन्वयक, IQAC), डॉ. ए. बी. बलुगडे (सह-समन्वयक, IQAC), डॉ. पी. बी. पाटील (लीड कॉलेज योजना समन्वयक), श्री. आर. जे. भोसले (प्रबंधक), श्री. एम. व्ही. भोसले (कार्यालय अधीक्षक) उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए. एस. कांबळे (प्रमुख – प्राणिशास्त्र विभाग) यांनी केले.

पहिल्या सत्रात डॉ. सागर व्हनाळकर (सह. प्राध्यापक व प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) यांनी “Introduction of Aquarium” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात अक्वालाइफ अक्वेरियम, कोल्हापूर येथील श्री. नरेंद्र कुलकर्णी यांनी “Aquarium Construction and Management” या विषयावर माहिती दिली. तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.

दुपारनंतर झालेल्या समारोप सत्रात कार्यशाळेचा आढावा प्रा. ए. एस. कांबळे यांनी सादर केला. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. जे. महाले यांनी मानले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना अक्वेरियम बांधणी, व्यवस्थापन व देखभाल याविषयी प्रत्यक्ष ज्ञान देणारी आणि कौशल्य विकसित करणारी ठरली.