प्रतिष्ठा न्यूज

शिवप्रतापाचे म्हणजेच अफजलखान वधाचे शिल्प बसविण्या प्रश्नी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांची स्वतः भेट घडवणार : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

प्रतिष्ठा न्यूज
सातारा प्रतिनिधी : प्रतापगड विकास प्राधिकरणाची मिटींग सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. सदर मीटिंगला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे हे हिंदू एकताचे पदाधिकऱ्यासह उपस्थित होते. सदर मीटिंग मध्ये प्रतापगडाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी  व संवर्धन संबंधी तसेच शिवप्रतापाचे तयार असलेले शिल्प बसवण्याबाबत मत मंडण्यात आले.

*यावेळी बोलताना हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की,* अफजल खान वधाचे शिल्प एक वर्ष झाले तयार झाले असून पावसाचे, निवडणुकीचे, आचारसंहितेचे कारण सांगून ते बसविण्यात आलेले नाही. राजकोट येथे पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला, पुणे येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा बसवण्यात आला.  तरी तिथीनुसार येणाऱ्या शिवप्रताप दिनादिवशी  27 नोव्हेंबर 2025 मला पूर्वी शिवप्रतापाचे शिल्प नाही बसवले तर महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते व शिवभक्त अफजल खान वधाचे  प्रतिकात्मक शिल्प अफजल खानाच्या थडग्या शेजारी नियोजित जागेत बसवण्यात येईल.

*यावेळी बोलताना प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य मिलिंद एकबोटे म्हणाले की,* हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी शिवप्रतापाचे शिल्प बसवण्याची केलेली मागणी ही योग्य असून शिवप्रतापाचे शिल्प अफजल खानाच्या थडग्या जवळ बसल्यास शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊन शासनाचा महसूल वाढणार आहे.

*यावेळी बोलताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की,* शिवप्रतापाचे अफजल खान वधाचे तयार असलेले शिल्प 27 नोव्हेंबर  2025 पर्यंत बसविण्यासाठी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दोन ते चार दिवसात प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण सदस्यांसमवेत व हिंदू एकता आंदोलन पदाधिकाऱ्यांसोबत  भेट घेऊन शिल्प बसवण्याबाबत चर्चा करणार.

यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खान वधाचे तयार असलेल्या शिल्पाचा फोटो प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या सदस्याना व जिल्हाधिकारी यांना दाखविले.

*(या बैठकीदरम्यान चर्चा करत असताना एका अधिकाऱ्याने अफजलखानाच्या थडग्याला “अफजल खानाची समाधी” असा उल्लेख करताच माजी आमदार नितीन शिंदे यांनी समाधी नाही “अफजल खानाचे थडगे” म्हणा असे म्हणत खडे बोल सुनावले.)*

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, अनिरुद्ध कुंभार, अरविंद येतनाळे, गजानन माने, प्रेम देसाई, यश पाटील, अभिजीत बारटक्के, संतोष शेंडे, सागर पावशे, अस्मिता लाड, राजू शेडगे, विजय नायडू, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles