हातकणंगले नगरपंचायतीवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवा : नामदार हसन मुश्रीफ

प्रतिष्ठा न्यूज
हातकणंगले प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घोषणा जवळ येत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रभाग निहाय आरक्षण व अंतिम मतदार याद्या निश्चित झाल्या असून पहिल्याच टप्प्यात या निवडणुका लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोल्हापूर येथील सिंचन भवनमध्ये आयोजित बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला. प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांशी प्रत्यक्ष चर्चा करीत योग्य उमेदवारांना योग्य संधी देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्षपदासह १७ जागांबाबत इच्छुकांनी मते व भूमिका बैठकीत मांडल्या. या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर व संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याची भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केल्यानंतर हातकणंगले नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.
बैठकीस अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर, तालुकाध्यक्ष शिरीष देसाई, शहराध्यक्ष अमित खोत, युवक शहराध्यक्ष विजय शिंदे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष निहाल कलावंत, विश्वासराव इंगवले, नगराध्यक्ष पदाचे दावेदार दीपक कुन्नुरे यांच्यासह अनिस मुजावर, मंगेश नरुटे, इमरान चौधरी, अभिषेक खोत, कृष्णात जाधव, सौरभ निगवे, नवनाथ मोरे, राहुल हापसे, मनोज दहीहंडी, मिलिंद चौगुले, प्रशांत खोत आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
