तासगावात बेदाण्याला अच्छे दिन,दिवाळी नंतरचा पहिलाच सौदा,दरात तेजी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये दिपावली नंतर बेदाणा सौदे सुरु करणेसाठी बाजार समितीने सांगली-तासगांव बेदाणा असोसिएशनचे सभासद व्यापारी व बाजार समितीचे सभापती, युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील,व्यापारी प्रतिनिधी संचालक, सुदाम माळी,संचालक कुमार शेटे,यांचे बरोबर चर्चा करुन सौदे काढणेसाठी बैठक घेतली.त्यामध्ये प्रामुख्याने दिवाळीपुर्वी काढलेल्या बेदाणा सौद्यांचे सर्व पेमेंट झिरो झालेची खात्री करुन घेतली.ज्यांचे पेमेंट झिरो झाले आहे.त्यांनाच सौदे काढणेस परवानगी देण्यात आली. शेतकरी पट्टी पेमेंट कालावधी कमी करणेसाठी बाजार समितीने कडक भूमिका घेतलेली आहे.तसेच खरेदीचे पेमेंट कालावधी कमी करणे बाबत सुचना देण्यात आल्या.आडत्यांनी ज्या खरेदीदाराचे पेमेंट ४० ते ४५ दिवसांत येत नाही,त्यांची नांवे बाजार समितीकडे द्यावीत,जे खरेदीदार व्यापारी ४० ते ४५ दिवसांत पेमेंट देणार नाहीत त्यांना सौद्यात भाग घेता येणार नाही,याबाबत ही चर्चा झाली. सदर बैठकीत चर्चेअंती दिपावली नंतर गुरुवार दिनांक :- ०६/११/२०२५ पासून बेदाणा सौदे सुरु करण्यात आले.सदर सौद्यामध्ये बेदाण्याच्या दरात प्रती किलो १५ ते २० रुपये वाढ झालेली दिसून आले.सदरच्या सौद्यामध्ये मे.धारेश्वर ट्रेडिंग कंपनी,मे.श्री.श्रीनिवास ट्रेडर्स,मे.गगन इम्पेक्स,मे.हडदरे ट्रेडिंग कंपनी, मे.धानम्मा ट्रेडिंग कंपनी,मे.एस.एस. कार्पोरेशन,मे.हिंगमिरे ट्रेडिंग कंपनी, मे.सिध्दीविनायक ट्रेडिंग कंपनी,या दुकानामध्ये सौदे काढणेत आले.एकुण आवक १४६५८ बॉक्स (२२० टन) २२ गाडी आवक झाली असून प्रत्यक्ष विक्री १०२६० बॉक्स (१५३ टन) १५ गाडी विक्री झाली असून सर्व प्रकारच्या बेदाण्या मध्ये प्रती किलो १५ ते २० रुपयांची वाढ झालेची दिसून येते सदर सौद्यास सुदाम माळी,अशोक बाफना,भूपाल पाटील, सुनिल हडदरे,गगन अग्रवाल,किरण बोडके,संभाजी माळी,जगन्नाथ घणेरे, प्रकाश लुनिया,राहूल बाफना,अनुज बन्सल,नितिन मर्दा,राम माळी, अनिल पटेल,अधिक शेटे,विनायक हिंगमिरे,तसेच कर्नाटक व महाराष्ट्र येथील शेतकरी,व्यापारी उपस्थित होते.
दर :-
हिरवा बेदाणा रु. ३३० ते रु. ४१५
पिवळा बेदाणा रु. ३२० ते रु. ३९५
काळा बेदाणा रु. ६० ते रु. २३५
तेव्हा सर्व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगांव बाजार पेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील, व प्रभारी सचिव रविंद्र बापू माने यांनी केले आहे.