प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या श्री मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचा उपक्रम, एक जीव लाखमोलाचा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :येथील श्री मंगलमूर्ती आरोग्य व रुग्ण सेवाभावी संस्था, तासगावने गेली नऊ वर्षे समाज उपयोगी विविध उपक्रम राबवले आहेत.त्यातील एक उपक्रम म्हणजे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना व ऊस वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना मोफत रेडियम रिफ्लेक्टर लावणे.या उपक्रमाची सुरुवात तासगाव मधून काल पासून करण्यात आली.
*उपक्रमाचे उद्दिष्ट*
सध्या सर्वत्र साखर कारखाने सुरू झाले आहेत व या कारखान्यांना लागणारा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली व ऊस वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. अशा वाहनांना पाठीमागे रेडियम नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अशी वाहने लगेच नजरेस पडत नाहीत यामुळे प्रत्येक वर्षी कितीतरी अपघात होतात व असे अपघात झालेल्या बातम्या आपण वारंवार वाचतो. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो ही बाब लक्षात घेऊन ही मंगलमूर्ती संस्था गेली नऊ वर्षे झाली हा उपक्रम सातत्याने राबवत आहे व थोड्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
उपक्रमाची माहिती
संस्थेचे सदस्य त्यांच्या कामानिमित्त प्रवास करत असताना ते आपल्या सोबत रेडियम पट्ट्या ठेवतात जेणेकरून रेडियम नसलेले ऊस वाहतूक करणारे वाहन दिसल्यास त्याला त्वरित रेडियम लावता यावे. प्रत्येक वर्षी संस्थेच्या वतीने 60 ते 70 ऊस वाहनांना मोफत रेडियम रिफ्लेक्टर लावले जातात.
*समाजातून मिळत आहे कौतुक*
संस्थेच्या सर्व उपक्रमांचे समाजातून कौतुक होत असून अशा उपक्रमातून सामाजिक जनजागृती करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!