प्रतिष्ठा न्यूज

तासगावात भाजपकडून मुलाखती, विविध पक्षातील नाराजांची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे.त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 60 जणांनी मुलाखती दिल्या.आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सत्यजित देशमुख,भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे – पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या.दरम्यान निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असतानाच भाजपने या निवडणुकीसाठी दमदार तयारी करत आघाडी घेतली आहे.तासगाव पालिकेची निवडणूक अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे आमदार रोहित पाटील गट,माजी खासदार संजयकाका पाटील गट यांच्यासह भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.दरम्यान,गेल्या निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील गटाने नगरपालिकेवर विजय मिळवला होता.दरम्यान,भाजपने ही निवडणूक स्वबळावर व ताकतीने लढवण्याचा निर्धार केला आहे.भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे – पाटील, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘कमळ’ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.प्रत्येक प्रभागात बैठका घेण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर भाजपकडून नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.पक्षनिरीक्षक व आमदार तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.मुलाखतीसाठी अनेक जणांनी गर्दी केली होती. नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी तब्बल 60 जणांनी मुलाखती दिल्या. तर थेट नगराध्यक्ष पदासाठी 6 जणांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीसाठी आलेल्यांमध्ये विविध पक्षातील नाराज असलेल्या अनेकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुलाखतीसाठी उपस्थित असणारे आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सत्यजित देशमुख,जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी ही निवडणूक ताकतीने लढावी,पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्रात पातळीवर मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत.त्यामुळे पालिकेवर जर भाजपची सत्ता आली तर तासगावचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल.त्यामुळे पालिकेवर ‘कमळ’ फुलवा,असे आवाहन केले.मुलाखतीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, अनिल लोंढे,स्वाती सूर्यवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील,महेश पाटील,गोविंद सूर्यवंशी, उदय राजोपाध्ये,सुशांत माने,विशाल भोसले,पुष्कर कालगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!