प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तासगावात सक्रिय,उमेदवारांची चाचपणी सुरु

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तासगाव शहरात विविध भागांमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गाठीभेटी व बैठकांचे सत्र सुरू आहे.महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना वेट अँड वॉच च्या भूमिकेत असली तरी शिवसेनेचे अंतर्गत कामकाज विविध भागात बैठका उमेदवार चाचणी त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठीची सुद्धा चाचणी गेली आठ दिवस झाले सुरू आहे.काल शहरांत प्रमुख शिवसैनिकांची बैठक घेऊन विविध वार्डातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.अनेक लोकांच्या घरी भेटी देऊन शिवसेना काम करत आहे.येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका किंवा स्थानिक पातळीवर होणाऱ्या आघाडीच्या बाबतीत भूमिका यामध्ये काय हालचाली होतात ते पाहून लवकरच भूमिका जाहीर करू अशी प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी दिली.या बैठकीला शहरातील शिवसैनिक महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका किंवा स्थानिक पातळीवर होणाऱ्या आघाडीच्या बाबतीत भूमिका यामध्ये काय हालचाली होतात ते पाहून लवकरच भूमिका जाहीर करू. शिवसेना पक्षाची भूमिका स्पष्ट होण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
शिवसेना पक्षाचे कामकाज सुरू असून,विविध वार्डातील इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घर-घर जाऊन जनसंपर्क साधत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!